चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, फोड, मुरूम घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. सुंदर त्वचेसाठी महागड्या क्रीम किंवा फेशिअल करून घेतले जातात. मात्र त्वचेची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पानांचा वापर करावा. या पानांच्या वापरामुळे त्वचेवर साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल तसेच त्वचा आतून डिटॉक्स होईल. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो वाढतो. (फोटो सौजन्य – istock)
त्वचेच्या सर्वच समस्या होतील नाहीशा! 'ही' पाने ठरतील चेहऱ्यासाठी संजीवनी
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने त्वचेवर वाढलेले मुरूम, पिंपल्स किंवा काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा आतून स्वच्छ होईल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने धार्मिक कार्यात वापरली जाते. तसेच ही पाने आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. तुळशीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
पुदिन्याच्या पानांचा वापर जेवण बनवताना केला जातो. तसेच शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे पाणी किंवा सरबत बनवून पिऊ शकता. याशिवाय पुदिन्याच्या पानांमध्ये असलेले मेंथॉल त्वचेमधील उष्णता कमी करते.
जेवणाची चव वाढवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. तसेच शरीरात साचलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत.
कोरफड जेल त्वचा आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. कोरफड जेल त्वचेवर रात्री झोपताना नियमित लावल्यास त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहील.