ऑफिसमधील वातावरण कायमच आनंदी आणि प्रसन्न राहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात स्टिकर, झाडे आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी लावल्या जातात. यामुळे ऑफिसमध्ये गेल्यानंतर आनंदी वातावरण निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला ऑफिसमधील वातावरण कायमच आनंदी राहण्यासाठी डेस्कवर कोणती झाडे लावावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावल्यास मानसिक आरोग्य कायमच संतुलित राहते. एक लहान रोप तुमची उत्पादकता आणि आनंद दोन्ही वाढवू शकतो.(फोटो सौजन्य: Pinterest)
ऑफिसमधील डेस्कवर कायमच राहील आनंदी वातावरण! 'ही' झाडे वाढवतील डेस्कची शोभा
ऑफिस आणि घरातील वातावरण कायमच आनंदी राहण्यासाठी बांबू पामचे रोप लावावे. हे झाडाला पातळ, लांब देठ आणि हिरवी पाने असतात, ज्यामुळे तुमच्या डेस्कवरील वातावरण आनंदी राहील.
इंग्रजी आयव्ही रोप कायमच हिरवेगार राहते. हे रोप ऑफिसमधील किंवा घरात कोणत्याही जागेला फ्रेश लुक देते. त्यामुळे खिडकीजवळ, बुकशेल्फवर तुम्ही इंग्रजी आयव्ही रोप लावू शकता.
बोस्टन फर्न हे रोप उबदार, दमट हवामानात वाढते. या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही. झुकलेली हिरवी पाने शेल्फ किंवा हँगिंग पॉटमध्ये अतिशय सुंदर दिसतात.
तुम्हाला तुमचा डेस्क रंगीत हवा असेल तर तुम्ही जरबेरा डेझी रोप लावू शकता. या रोपाला रंगीत फुले येतात. कामाच्या ठिकाणी ताजेपणा आणि आनंद वाढवण्यासाठी जरबेरा डेझी लावावे.
घराची किंवा ऑफिसची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही लिलीचे रोप लावू शकता. लिलीच्या झाडाला सुंदर पांढऱ्या रंगाची किंवा इतर वेगवेगळ्या रंगाची फुले येतात.