बिग बॉस 4 मध्ये जमलेली सर्वांची लाडकी जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी पहिली मंगळागौर साजरी केली. यावेळी नेहमीच्या टिपिकल रंगांपेक्षा वेगळा अशा लवेंडर नऊवारीची निवड करत अमृताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर प्रसादही धोतर कुरत्यामध्ये कमालीचा हँडसम दिसत होता. पाहा अमृता आणि प्रसादचा हा आकर्षक लुक (फोटो सौजन्य - @khwabeeda_amruta Instagram)
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने पहिल्या मंगळागौरीचे व्रत साजरे केले. यावेळी दोघेही अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होते. अमृताने आपल्या सोशल मीडियावर याचे खास फोटो शेअर केलेत
नटूनथटून साजरी केली मंगळागौर..प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और! ज्याच्यासाठी हे व्रत केले, त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो अशी भावना अमृताने व्यक्त केली
अमृताने मॉडर्न मराठमोळा लुक केला असून लवेंडर नऊवारी नेसली होती. यासह तिने मॅचिंग नेकलेस, कानातले घातल्याचे दिसून आले
आपल्या कुटुंबीय आणि मैत्रिणींसह अमृताने मंगळागौरीचं व्रत आणि पूजा यथासांग केली. यावेळी तिचा लुक पाहण्यासारखा होता
मंगळागौरीच्या पूजेची मांडणी आणि यावेळी काय काय मजा केली याचे सर्व फोटो अमृताने शेअर केले असून तिच्या चाहत्यांना हे खूपच आवडलंय
मंगळागौरीचे खेळही अमृताने खेळले असून या फोटोंमधून तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येतोय. अमृता आणि प्रसादने नक्कीच यावेळी मजा केली असणार
प्रसादने यावेळी ऑफव्हाईट रंगाचा कुरता आणि धोतर घालून अमृतासह मराठमोळा लुक केलाय. तर अमृताने मिनिमल मेकअप आणि साध्या हेअरस्टाईलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले