'नटरंग', 'चंद्रमुखी', '36 डेज', जीवलगा', 'सत्यमेव जयते', 'राझी', 'चोरीचा मामला', 'कट्यार काळजात घुसली' अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्रीच्या या खास दिवसानिमित्त आपण तिची संपूर्ण कारकीर्द आणि संपत्ती जाणून घेणार आहोत.
मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्री नेहमीच तिच्या दमदार नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांचे मन जिंकले आहे.

अमृताने फक्त सिनेमांमध्ये नाही तर, रिऍलिटी शोमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभिनेत्रीने नेहमीच तिच्या अभिनयकौशल्याने लिखाण मोहित केले आहे. झलक दिखला जा या हिंदी रिऍलिटी शो मधून अमृताला प्रसिद्धी मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, 'खतरों के खिलाडी' शोसाठी अमृताचं मानधन प्रति एपिसोड 1.5 लाख रुपये होती. तर 'झलक दिखला जा 10' शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनेत्रीला 10 लाख रुपये मिळाले होते.

अमृता खानविलकरच्या मनधनाबद्दल सांगायचे झाले तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्री एका सिनेमासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते. तसेच अभिनेत्रीची 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मुंबईत आलिशान घर देखील घेतलं आहे. घराचे फोटो अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अमृता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.






