बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने IMDb च्या लिस्ट मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अमृता खानविलकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशातच ती नुकतीच इमरान हाश्मीसोबत "तस्करी" या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

मनोरंजन विश्वात सगळ्यात महत्वपूर्ण मनाला जाणाऱ्या IMDb ची या आठवड्याची आवडत्या कलाकारांची लिस्ट नुकतीच सोशल मीडियावर समोर आली आहे. IMDb च्या टॉप 10 लिस्ट मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर अव्वल स्थान मिळवले आहे.

बॉलीवूडच्या बड्या प्रोजेक्ट्स मध्ये अमृता वारंवार दिसत असताना आता IMDb च्या टॉप लिस्ट मध्ये तिने बॉलीवूड स्टार्स सोबत अव्वल स्थान निर्माण केलं आहे. बॉलीवूडमध्ये तिच्या कामाच्या चर्चा तर आहेच पण IMDb पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीच्या टॉप लिस्ट मध्ये अमृता 2 क्रमांकावर आहे.

बॉलीवूड मधल्या अनेक बड्या स्टार्सना मागे टाकत सई IMDb च्या टॉप लिस्ट मध्ये प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री ठरली आहे. अमृताच्या कामाचं सातत्य आणि बॉलीवूड मध्ये तिच्या वैविध्यपूर्ण कामाच्या चर्चा नेहमी होतात.

"तस्करी" मधल्या अमृताचा अँक्शनसीनची चर्चा असताना IMDB लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येऊन अमृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमृताने आजवर बहुआयामी भूमिका साकारून कायम प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत.

एकंदरीत लग्नपंचमी सारखं नाटक, तस्करी सारखी सुपरहिट वेब सीरिज सुरू असताना अमृता बॉलीवूडमध्ये बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स करत असून आगामी स्पेस जेन चांद्रयान या प्रोजेक्ट मध्ये ती महत्त्वपूर्ण वेगळी भूमिका साकारणार आहे.






