महाराष्ट्रातील नऊवारी साडी राज्याच्या समृद्ध संस्कृतीची आणि परंपरेची ओळख मानली जाते. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच स्त्रिया नऊवारी साडी अतिशय आवडीने नेसतात. महाराष्ट्राची नऊवारी साडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याशी आणि प्राचीन काळातील महिलांशी जोडलेली आहे. ही साडी सुमारे नऊ गज लांबीची असल्यामुळे या साडीला नऊवारी साडी असे म्हणतात. पेशवे काळातील स्त्रियांना दैनंदिन कामे आणि युद्धकाळातील हालचाली सहज करता यावी, यासाठी धोतरासारख्या पद्धतीने साडी नेसली जायची. नऊवारी साडी अतिशय आरामदायी आणि सहज नेसता येईल, अशी आहे. तिच्या पारंपरिक सौंदर्यामुळे नऊवारी साडी अजूनही महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया नऊवारी साडीचा रंजक इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)
परंपरा, सौंदर्य आणि शौर्याची ओळख! महाराष्ट्राच्या नऊवारी साडीचा रंजक इतिहास आणि खास वैशिष्ट्य

महाराष्ट्रातील लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि पारंपरिक कार्यक्रमांमध्ये नऊवारी साडीला विशेष महत्व आहे. सोनं, मोती आणि विविध डिझाईनचे पारंपरिक आणि मराठमोळे दागिने नऊवारी साडीवर घातले जातात.

नऊवारी साडी काष्टा किंवा धोती स्टाईलमध्ये नेसली जाते. पूर्वीच्या काळी महिला घोडेस्वारी, युद्ध आणि हालचालींसाठी सोयीस्कर असा पेहराव हवा होतो. हा पेहराव स्त्री सामर्थ्य, वारसा आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो.

नऊवारी साडी नऊ वारांची असते, त्यामुळे साडीमध्ये परकर घालण्याची अजिबातय आवश्यकता भासत नाही. याशिवाय हल्ली बाजारात नऊवारी साडी शिवून सुद्धा मिळते.

नऊवारी साडी ब्राह्मणी आणि पेशवाई या दोन प्रकारे नेसली जाते. नऊवारी साडी केवळ फॅशन म्हणूनच नाहीतर मराठमोळी परंपरा जपण्यासाठी सुद्धा नेसली जाते.

मराठमोळी नऊवारी साडी हे केवळ कापड नसून महाराष्ट्रातील महिलांच्या ताकद, लवचिकता आणि वारशाची महत्वपूर्ण ओळख आहे. नऊवारी साडी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात नेसू शकता.






