‘अनन्या’ चित्रपटातील ‘न कळता’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
‘अनन्या’चा (Ananya) ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणं (Ananya Movie Song) सोशल मीडियावर झळकलं आहे. हृता दुर्गुळे (Hruta Durgule) व चेतन चिटणीस (Chetan Chitnis) यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ (Na Kalta Song) असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा (Bela Shende) सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. अभिषेक खणकर यांनी हे गाणं शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपट येत्या २२ जुलैपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘न कळत’ या गाण्यात एकमेकांविषयी असलेल्या तरल भावना व्यक्त करत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन देत आहेत. प्रेमीयुगुलांच्या मनाला स्पर्श करणारे हे गाणं अतिशय श्रवणीय आहे.