ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
संपूर्ण देशभरात गौरी गणपतीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर दोन किंवा तीन दिवसांनी घरात गौराईचे आगमन होते. घरात गौराई आल्यानंतर एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. गौराई घरात आल्यानंतर त्यांना सुंदर साडी आणि दागिन्यांनी सजवले जाते. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्या अर्पण केला जातो. आज आम्ही तुम्हाला ज्येष्ठ गौरी आवाहनानिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य: Pinterest)
Ganesh Chaturthi 2025 : भारतातच नाही तर या 4 देशांमध्येही मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव
आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे ही सदिच्छा! गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
गौरी गणपतीच्या आगमना, सजली अवघी धरती, सोनपावलाच्या रुपाने ती येवो आपल्या घरी, होवो आपली प्रगती, लाभो आपणास सुख समृद्धी गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
आली आली गौराई
सोन पावलांच्या रुपाने
आली आली गौराई
धनधान्यांच्या रुपाने
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
गौरी माते नमन करते तुला
अखंड सौभाग्य लाभू दे मला
हेच मागणं मागते तुला
गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!
आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख-समृद्धी,
गौरी आवाहनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
ज्येष्ठ गौरी आवाहनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गौराई तुमच्या घरी सुख-समृद्धी घेऊन येवो.
सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा आरतीची घाई,
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया,
घरा दारा लाभो आशीर्वादाची छाया
गौरी पूजनाच्या शुभेच्छा !
गवर गौरी ग गौरी ग
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे,
गौरी पूजनाच्या शुभेच्छा !
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवघी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख -समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी
संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल
गौरी पूजनाच्या मनापासून शुभेच्छा!
हाती कडे पायी तोडे पैंजणाची,
रुणझुण नथकूडी बाई बुगडी कंकणाची,
झुमझुम मधुर ध्वनीच्या नादामध्ये
भक्तां घरी चालली,
सोनियाच्या पावलांनी महालक्ष्मी आली…
आपणा सर्व प्रिय जणांना..
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!
मंगल आरती सोळा वातींची
पुजा करु शिवा सह गौरीची
जय जय गौराई..
तिच्या मनी असे एक आशा
होऊ नये तिची निराशा
होवो सर्व इच्छांची पूर्ती
समृद्धी घेऊन आली गौराई!
ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी माता
आपणां सर्वांच्या घरी, भरभराट,
निरोगी आरोग्य, दीर्घायुष्य,
मुबलक धनधान्य तसेच व
विद्याभ्यासात सुयश घेऊन ये
आणि तिची कृपा दृष्टी निरंतर
आपणां सर्वांवर राहो…
घागर घुमूदे घुमूदे, रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा, गवर माझी लाजू दे
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा
गौरी पूजनाच्या शुभेच्छा!