फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये वाढती वाहनांची डिमांड अनेक विदेशी ऑटो कंपन्यांना भारतात आपल्या दमदार कार्स लाँच करण्यास प्रोत्साहित करत आहे. म्हणूनच तर अनेक विदेशी ऑटो कपन्या देशात कार्यरत आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Renault. या कंपनीने भारतीय ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये Renault Kiger Facelift लाँच झाली आहे.
भारतीय बाजारात रेनॉल्टने किगरचा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केला आहे. जर तुम्ही या एसयूव्हीचा CVT व्हेरिएंट खरेदी करून घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊया.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Tata Altroz Facelift बेस व्हेरिएंट तुमच्या दारात उभी, किती असेल EMI?
रेनॉल्टने 24 ऑगस्ट रोजी किगरचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. या एसयूव्हीच्या सीव्हीटी व्हेरिएंट म्हणून टेक्नो टर्बो सीव्हीटी देण्यात आले आहे. कंपनी या एसयूव्हीचा सीव्हीटी व्हेरिएंट 9.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर 9.99 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीसह त्यावर नोंदणी आणि विमा देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला सुमारे 70 हजार रुपये नोंदणी कर आणि सुमारे 43 हजार रुपये विमा भरावा लागेल. त्यानंतर दिल्लीमध्ये या कारची ऑन-रोड किंमत 11.13 लाख रुपये होईल.
जर तुम्ही रेनॉल्ट किगरचा Techno Turbo CVT व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 9.13 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला नऊ टक्के व्याजासह सात वर्षांसाठी 9.13 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 14688 रुपयांचा EMI भरावा लागेल.
TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 9.13 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 14688 रुपयांचा ईएमआय भरावे लागतील. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला रेनॉल्ट किगर फेसलिफ्टच्या टेक्नो टर्बो सीव्हीटी प्रकारासाठी सुमारे 3.20 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 14.33 लाख रुपये असेल.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये रेनॉल्टने किगर फेसलिफ्ट आणली आहे. या सेगमेंटमध्ये, ही कार Nissan Magnite, Maruti Brezza, Tata Punch, Hyundai Venue, Kia Syros, Kia Sonet, सारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.