लातूर जिल्ह्यात 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत सरासरी 91.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 10 पैकी 08 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चाकूर तालुक्यात सर्वाधिक 152.4 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील 60 पैकी 36 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 66 रस्ते आणि पूल प्रभावित झाल्याने या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत आतापर्यंत 12 नागरिक आणि 30 जनावरांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.