सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कालेली-बंगलेवाडी येथे गेली १५० वर्षांची परंपरा आजही कायम आहे. येथे ब्राह्मण आणि बहुजन समाजाचे गणपती एकाच माटवीखाली विराजमान होत असून, दोन्हींचे पूजन एकत्र केले जाते. वासकर कुटुंबीय पूर्वी रांगणेकर कुटुंबीयांकडे कामाला होते. रांगणेकर कुटुंब अमेरिकेला गेल्यानंतर, त्यांचा गणपती वासकरांनी स्वतःच्या गणपतीसोबत एकाच माटवीखाली बसवला. आज चौथी पिढी ही परंपरा पुढे नेत आहे. हा अनोखा उपक्रम एकता, बंधुत्व आणि सर्वधर्म समभावाचा जिवंत संदेश देतो.