पवित्र रिश्ता आणि बिग बॉस फेम अंकिता लोखंडे नेहमी आपल्या लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती सुंदर गुलाबी रंगाच्या साडीमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने केली इंस्टग्राम पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर तिचा नवा फोटोशूट शेअर केला आहे. कमेंट्समध्ये तिच्या अप्रतिम सौंदर्याला पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये चाहत्यांना प्रश्न केला आहे कि 'साडीचे सौंदर्य परिधान करण्यामागे दडलेले असते, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?'
अभिनेत्री पोस्टमध्ये गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. गुलाबी साडीत तिचे गुलाबी सौंदर्य अतिशय खिळून आले आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून भारतातील घराघरात पोहचली. तिने साकारलेली अर्चना ही भूमिका इतक्या वर्षानंतरही लोकांना आठवणीत आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या कलर्सवरील लाफ्टर्स शेफ नावाच्या कार्यक्रमात शेफ आहे. या कार्यक्रमाला फार पसंती मिळत आहे.