आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा १ मे २०२५ रोजी ३७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनुष्काने अभिनेत्री म्हणून एक उत्तम करिअर घडवले आहे याचा तिला अभिमान आहे. अनुष्का शर्माने यशराजसोबत एक नाही तर अनेक चित्रपट केले. अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, अनुष्का शर्माने क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न केले. हे दोघेही आता सगळ्यांचे आवडते कपल म्हणून ओळखले जातात. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद होतो. आणि सगळेच असा जोडीदार आपल्याला सुद्धा मिळावा अशी प्रार्थना करतात. या दोघांची प्रेम कथा कशी सुरु झाली हे जाणून घेऊयात.
सुरुवातीला भांडण मग झाले प्रेम! अशी सुरु झाली विराट- अनुष्काची प्रेमकहाणी? (फोटो सौजन्य - x अकाउंट)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट खूप रंजक होती. २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट सेटवर झाली. विराट कोहलीने मुलाखतीत सांगितले होते की अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीत तो खूप घाबरला होता. तथापि, नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली.
२०१४ मध्ये विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले. हा सामना पाहण्यासाठी अनुष्काही पोहोचली. शतक पूर्ण केल्यानंतर, विराटने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनुष्काला फ्लाइंग किस दिली. आणि हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लग्नाच्या ३ वर्षानंतर २०२१ मध्ये अनुष्काच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला. दोघेही पालक झाले आणि ही बातमी सोशल मीडियावर पसरली आणि चाहते त्यांचे अभिनंदन करू लागले. या दोघांनी मुलीचे नवा वामिका ठेवले. आणि यानंतर त्यांनी २०२४ मध्ये त्यांच्या मुलाचे स्वागत केले ज्याचे नाव या जोडप्यानी अकाय ठेवले.
विराट अनुष्काच्या जोडीबद्दल सर्वात खास गोष्ट म्हणजे ते दोघेही प्रत्येक पावलावर एकमेकांसोबत उभे राहतात आणि एकमेकांना पूर्णपणे पाठिंबा देतात. जेव्हा अनुष्काला विराटच्या खराब कामगिरीबद्दल ट्रोल केले जाते तेव्हा विराट देखील ट्रोलर्सना उत्तर देताना दिसतो.