गाझातील कारवाया इस्रायलला पडल्या महागात; 'या' देशाने शस्त्रास्त्र करार रद्द केल्याने झाले अब्जावधींचे नुकसान (फोचो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War news in Marathi : तेल अवीव : ऑक्टोबर २०२३ पासून इस्रायल आणि हमास युद्धाने (Israel Hamas War) गाझात प्रचंड विध्वंस माजवला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलच्या गाझातील हमासविरोधी कारवाया अधिक तीव्र झाल्या आहेत. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. ज्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलचे १ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असून इस्रायल मोठ्या संरक्षण उद्योग संकटात फसला आहे. इस्रायलच्या सर्वात जवळच्या मित्रानेच त्यांच्यासोबतचे संरक्षण करार रद्द करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांची चिंता वाढली आहे.
नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्…; २ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलचा जवळचा मित्र स्पेनने ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्ससोबतचा शस्त्र करार निलंबित केला आहे.
यामुळे इस्रायला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. इस्रायलच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायली कंपन्यांसोबत करांराची किंत अंदाजे ६५४ डॉलर इतकी होती. तसेच एक अब्जावधींचा करारही रद्द झाला आहे. यामुळे इस्रायलच्या शस्त्रांच्या आयातीला मोठा धक्का बसला आहे.
सध्या इस्रायली संरक्षण अधिकाऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे की, इतर देशांनीही इस्रायलसोबतचे करार रद्द केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, करार रद्द करण्याचा हेतू इस्रायलवर गाझातील कारवाया थांबवण्यासाठी दबाव आणणे आहे. पण इस्रायल कोणत्याही परिस्थिती हमासला नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही, असे इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की, राफेलकडून त्यांनी लाइटवनिंग ५ टार्गेटिंग पॉड्सची खरेदी रद्द केली आहे. या कराराची किंती २१८ दशलक्ष होती. तसेत पल्स सॉकेट सिस्टीमसाठी इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्स आणि दोन स्पॅनिश कंपन्यांसोबतही ७६३ डॉलर्सचा करार रद्द करण्यात आला आहे.
याशिवाय स्पेनने २०२५ च्या सुरुवातीला देखील एल्बिट्च्या कंपन्यांसोबत दशलक्ष डॉलर्सचा दारुगोळा करार रद्द केला होता. स्पेनने शास्त्रास्त्रांवर बंदी घातल्यामुळे इस्रायला पुरवठा कमी पडत आहे. तसेच स्पेनने कच्चा मालाच्या निर्यातींवरही निर्बंध लादले आहे. यामुळे इस्रायली कंपन्यांना अन्य पर्याय शोधावे लागत आहे.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी गाझातील इस्रायलच्या कारवायांवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. स्पेनच्या मते, इस्रायलला शस्त्र पुरवठा बंद झाल्या गाझातील कारवाया थांबतील आणि यामुळे पॅलेस्टिनींचा नरसंहार थांबेल. पण सध्या इस्रायल यासाठी पर्यायी मार्ग शोधत असून खरेच यामुळे युद्ध थांबेल का असा प्रश्न पडला आहे.
प्रश्न १. इस्रायलचे अब्जावधींचे नुकसान का होत आहे?
इस्रायलच्या गाझातील कारयावायांमुळे त्यांच्या मित्र देशाने इस्रायलसोबतचे अनेक संरक्षण करार रद्द केले आहेत, ज्यामुळे इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
प्रश्न २. कोणत्या देशाने इस्रायलसोबत केला संरक्षण करार रद्द?
इस्रायलला मित्र देश स्पेनने इस्रायली कंपन्यांसोबतच संरक्षण करार रद्द केले आहेत.
प्रश्न ३. इस्रायलने संरक्षण करार रद्द झाल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
इस्रायलच्या मते, त्यांच्यावर गाझातील कारवाया थांबवण्यासाठी शस्त्रास्त्र करार रद्द करुन इस्रायवर दबाव आणला जात आहे. यामुळे गाझातील युद्ध संपेल असे त्यांना वाटत आहे.
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी