भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबर पासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. यासाठी दोन्ही संघाची घोषणा करण्यात आली आहे, बांग्लादेशच्या संघामध्ये नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारत बांग्लादेश यांच्यामध्ये या मालिकेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. परंतु ही मालिका होणार असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते. आता भारत बांग्लादेश मालिकेसाठी बांग्लादेशचा क्रिकेट संघ भारतामध्ये दाखल झाला आहे. याचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डने शेअर केले आहेत यावर एकदा नजर टाका.
१९ सप्टेंबरपासून सुरु भारत विरुद्ध बांग्लादेश मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ भारतात दाखल. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये १९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे, यासाठी बांग्लादेशचा संघ भारतामध्ये रवाना झाला आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशच्या संघाची भारताविरुद्ध मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे, यामध्ये बांग्लादेशचा संघ कर्णधार शांतोच्या नेतृत्वाखाली मैदानात उतारबार आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशच्या संघाने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या संघाला २-० ने पराभूत करून कसोटी मालिका नावावर केली होती. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
भारत बांग्लादेश यांच्यामध्ये २ सामान्यांची कसोटी मालिका आणि ३ सामान्यांची T२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून होणार आहे. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया
बांग्लादेशने मालिका एकतर्फी जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच गगनात असेल, त्यामुळे ते भारतासाठी आव्हान उभे करून शकतात. फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट बोर्ड सोशल मीडिया