लग्न झाल्यानंतर नव्या नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. त्यात सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या मंगळसूत्राची कायमच सोशल मीडियासह जगभरात सगळीकडे मोठी क्रेझ असते. पारंपरिक मंगळसूत्राला मॉर्डन आणि स्टायलिश लुक देऊन सुंदर डिझाईन तयार केल्या जातात. हल्ली सगळ्यांचं अतिशय नाजूक आणि छोट्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींनी त्याच्या लग्नात परिधान केलेल्या काही सुंदर मंगळसूत्र डिझाईनबद्दल सांगणार आहोत. या डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही रोजच्या वापरात घालू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
रोजच्या वापरासाठी सेलिब्रिटींनी परिधान केलेले युनिक आणि स्टायलिश डिझाईनचे मंगळसूत्र नक्की करा ट्राय, गळ्यात दिसतील शोभून

काळे मणी आणि नाजूक डिझाईनचे पेंडंट असलेले सुंदर मंगळसूत्र कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर शोभून दिसते. सोशल मीडियावर या डिझाईनच्या मंगळसूत्राची मोठी क्रेझ आहे.

दीपिका पदुकोनने तिच्या लग्नात काळ्या मण्यांचे नाजूक मंगळसूत्र घातले होते. या डिझाईनचे मंगळसूत्र इंडो वेस्टर्न कपड्यांवर अतिशय सुंदर दिसते.

लग्नात कायमच मोठ्या मोठ्या डिझाईनचे मंगळसूत्र घातले जातात. पण त्याऐवजी साडीवरील लुक आणखीनच मिनिमलिझम करण्यासाठी नाजूक काळे मणी आणि वाट्या असलेले मंगळसूत्र घालू शकता.

सोन्याच्या वाट्यांप्रमाणे डायमंड आणि वेगवेगळ्या रत्नांचा वापर करून पेंडेंट बनवले जातात.त्यात सोलिटेअर हिरा किंवा लहान हिऱ्यांची नाजूक डिजाईन सगळ्यांचं आवडते.

यामी गौतम, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्यासारख्या अभिनेत्रींनी परिधान केलेले युनिक डिझाईन मंगळसूत्र गुंतागुंतीचे आणि युनिक पेंडंट दिसते.






