साडी नेसल्यानंतर किंवा इतर वेळी सर्वच महिला आणि मुलींच्या हातामध्ये एकतरी बांगडी ही असतेच. बांगडी किंवा कडा घातल्यानंतर हात उठावदार दिसतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा साडी नेसल्यानंतर हातामध्ये बांगड्या घातल्या नाहीतर हात मोकळे मोकळे वाटू लागतात. त्यामुळे हातामध्ये बांगड्या असतील तर हात आणि आपला लुक आणखीन सुंदर दिसतो. पूर्वीच्या काळातील महिलासुद्धा हातामध्ये नेहमी बांगड्या घालायच्या. ज्यामुळे हात खूप सुंदर दिसायचे. आज आम्ही तुम्हाला सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी हात घालण्यासाठी बांगड्यांचे काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या पद्धतीच्या बांगड्या जर तुम्ही साडीवर घातल्या तर तुमचे हात आणखीन सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-pinterest)
बांगड्यांचे काही सुंदर डिझाइन्स
पूर्वीच्या काळातील महिला आणि मुली हातामध्ये तोडे घालायच्या. या पद्धतीचे तोडे प्रामुख्याने राज घराण्यातील महिलांच्या हातामध्ये दिसू आले आहेत. हे तोडे आता सोनं, चांदी इतर धातूंमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
चिकनकारी किंवा साधी कॉटनची साडी घातल्यानंतर सोन्याच्या दागिने घालण्याऐवजी तुम्ही ऑक्सिडाइज दागिने घातले तर तुमचा लुक खूप क्लासी आणि सुंदर दिसेल.
नऊवारी साडी किंवा सुंदर साडीचा ड्रेस घातल्यानंतर हातामध्ये जर मोत्याच्या बांगड्या असतील तर तुमचा लुक खूप उठावदार आणि आकर्षक दिसेल.
बाजारात अनेक रंगांच्या बांगड्या उपलब्ध आहेत. तुमच्या साडी किंवा ड्रेसला मॅच होतील अश्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये रंगाच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घालू शकता.
सर्वच महिलांना सोन्याच्या बांगड्या खूप आवडतात. साडीवर किंवा ड्रेसवर घालण्यासाठी बांगड्यांची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. या पद्धतीच्या बांगड्या जर तुम्ही हातात घातल्या तर तुमचे हात भरलेले वाटतील.