महाराष्ट्रीयन लग्न समारंभात नवरा नवरीला मुंडावळ्या बांधण्याची पद्धत आहे. मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधल्यामुळे नवरा नवरीचा लुक खूप सुंदर आणि उठावदार दिसतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात परंपरा जरी वेगळ्या असल्या तरीसुद्धा काही गोष्टी एक सारख्याच फॉलो केल्या जातात. लग्नाच्या दिवसांमध्ये व्यवस्थित झोप होत नाही.जागरणाचा ताण कमी करण्यासाठी डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंडावळ्यांच्या काही सुंदर डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाईन्सच्या मुंडावळ्या लग्नात नक्की ट्राय करा.(फोटो सौजन्य-pinterest)
लग्नात मुंडावळ्या का बांधतात
तुम्हाला जर नाजूक साजूक मुंडावळ्या हव्या असतील तर ही डिझाईन अगदी उत्तम आहे.
फुलांपासून बनवलेल्या मुंडावळ्या तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही या डिझाईनच्या मुंडावळ्या तयार करून घेऊ शकता. यामुळे तुमचा लुक इतर नवरींच्या लुकपेक्षा थोडा वेगळा आणि उठावदार दिसेल.
हल्ली नवरा नवरीच्या डोक्याला मोत्याच्या मुंडावळ्या बांधल्या जातात. या मुंडावळ्या पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीवर खूप उठावदार दिसतील. नवरा नवरीला मॅचिंग मुंडावळ्या बांधल्या जातात.
पूर्वीच्या काळापासून त्ये आत्तापर्यंत मोत्याच्या मुंडावळ्या बांधण्याची पद्धत होती. मोठ्या आकाराच्या मोतींचा वापर करून बनवलेल्या मुंडावळ्या खूप सुंदर दिसतात.
तुम्हाला जर हेवी दागिने घालायची सवय असेल तर तुम्ही या डिझाईनच्या मुंडावळ्या घालू शकता. मोती किंवा नाजूक लटकन असलेल्या मुंडावळ्या खूप सुंदर आणि उठावदार दिसतील.