गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बाप्पाच्या आगमनच्या आधल्या दिवशी हरतालिका पुजली जाते. “सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे` अशी प्रार्थना करून हरतालिकेची पूजा केली आहे. महिला, मुली हरतालिकेची पूजा करतात. त्यामुळे यंदाच्या हरतालिका पूजेसाठी या डिझाइन्सची सुंदर मेहंदी तुम्ही सुद्धा तुमच्या हातांवर काढा. यामुळे तुमचे हात अधिक सुंदर आणि उठावदार दिसतील. (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
हरतालिकेला काढा हातावर सुंदर मेहंदी

घावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही. अशावेळी तुम्ही हातांच्या बोटांवर सुंदर मेहंदी काढू शकता. बोटांवर काढलेली मेहंदी हातांवर थोडी युनिक दिसते.

सण उत्सवाच्या दिवसांमध्ये सगळीकडे खूप घाई गडबड असते. या घाईच्या दिवसांमध्ये महिलांना जास्त वेळ भेटत नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही हातावर अरेबिक मेहंदी काढू शकता.

काहींना हातावर खूप जास्त बारीक नक्षीकाम केलेली मेहंदी आवडते. त्यामुळे यंदाच्या हरतालिका पूजेसाठी या डिझाइन्सची मेहंदी काढू शकता. भरलेली मेहंदी काढण्यासाठी खूप वेळ लागतो. मात्र हातावर ही मेहंदी खूप सुंदर दिसते.

सण उत्सवाच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना नटायला थाटायला खूप आवडत. त्यामुळे सर्वच महिला हातावर छोटी मोठी मेहंदी काढतात.

हल्ली सगळीकडे हिना मेहंदीचा ट्रेंड आला आहे. हिना मेहंदी काढायला आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते. तसेच हिना मेहंदीमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाइन्स आहेत.






