सर्वच महिला आणि मुलींना हातांवर मेहंदी काढायला खूप आवडते. मेहंदी काढल्यानंतर हात आकर्षक आणि सुंदर दिसतात. हल्ली सोशल मीडियावर मेहंदीच्या अनेक नवनवीन डिझाइन्स उपलब्ध झाल्या आहेत. सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्नसमारंभात हातांवर मेहंदी काढल्याशिवाय कोणता सोहळा पार पडल्यासारखे वाटतं नाही. सध्या सगळीकडे लग्नसमारंभाचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हातांवर काढण्यासाठी मेहंदीच्या काही सुंदर आणि क्लासिक डिझाइन्स सांगणार आहोत. या डिझाइन्स नक्की ट्राय करून पहा. यामुळे तुमच्या हातांची शोभा वाढेल.(फोटो सौजन्य-pinterest)
लग्नात काढण्यासाठी सुंदर मेहंदी डिझाइन्स

काहींना हातांवर जास्त मोठी आणि भरलेली डिझाईन काढायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही हातांवर सुंदर आणि युनिक डिझाईनची अरेबिक मेहंदी काढू शकता. अरेबिक मेहंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

पूर्ण हात भरून महेंदी नको असल्यास तुम्ही या डिझाइन्सची साधी मेहंदी काढू शकता. यामुळे तुमचे हात आकर्षक आणि उठावदार दिसतील.

लग्नसराईचे दिवस सुरु असल्यामुळे नवरीच्या हातावर वेगवेगळ्या डिझाईनची भरलेली मेहंदी काढली जाते. त्यामुळे तुम्ही नवरीच्या हातावर या डिझाइन्सची बारीक नक्षीकाम काढू शकता.

तुम्हाला जर कमी नक्षीकाम केलेली पण भरलेल्या डिझाईनची मेहंदी हवी असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. सगळीकडे या डिझाईनची मोठी क्रेझ वाढली आहे.

बदलत्या काळानुसार अनेक गोष्टींमध्ये बदल होत आहेत. त्याप्रमाणे हल्ली नवरीच्या हातावर मेहंदीमध्ये डोली, लग्न मंडप, नवरा नवरीचे फोटो इत्यादी अनेक गोष्टी काढल्या जातात.






