पुरंदर पंचायत समिती (फोटो- टीम नवराष्ट्र)
सभापतीपदी राष्ट्रवादीचे अमित झेंडे
उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रविण जगताप
प्रवीण जगताप यांची सहा विरुद्ध दोन अशा मतांनी निवड
सासवड: पुरंदर तालुका पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे अमित भाऊसाहेब झेंडे यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची सहा विरुद्ध दोन अशा मतांनी निवड झाली. दरम्यान निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला आठ पैकी चार जागांवर विजय मिळाला होता. दोन जागा शिवसेनेला तर दोन जागांवर भाजपला विजय मिळाला होता. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी भाजपला सत्तेचे निमंत्रण देवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या चर्चा सुरु होण्यापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती अस्तित्वात आली. युतीच्या फॉर्मूल्यानुसार सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अमित झंडे यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे प्रवीण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना भाजपच्या दोन सदस्यांपैकी सायली शिंदे यांनी सभापतीपद तर माऊली यादव यांनी उपसभापती पदासाठी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.
पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी
सभापती अमित झेंडे आणि उपसभापती प्रवीण जगताप यांना युतीची प्रत्येकी सहा मते मिळाली तसेच विरोधी भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार सायली शिंदे आणि उपसभापती पदाचे उमेदवार माऊली यादव यांना त्यांचीच दोन मते मिळाली. त्यामुळे सहा विरुद्ध दोन अशा राष्ट्रवादीचे मतांनी अमित झेंडे आणि शिवसेनेचे प्रवीण जगताप निवडून आल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी जाहीर केले. गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा
दरम्यान नवनिर्वाचित सभापती अमित झेंडे आणि उपसभापती प्रवीण जगताप यांचे युतीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, जेष्ठ नेते विजयराव कोलते, जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, शरद जगताप, गौरी कुंजीर, वामन जगताप, बाळासाहेब भिंताडे, विराज काकडे, संतोष कुंभारकर, शिवसेनेचे उमेश गायकवाड, मंदार गिरमे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली झेंडे, प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर, अर्चना कटके, स्मिता निगडे, मोनिका कांबळे आदी उपस्थित होते.






