पोट साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इसबगोलचे नाव तुम्ही ऐकले असेलच. सायलियम हे प्लांटॅगो ओवाटा नावाच्या वनस्पतीचे बीज आहे. त्याला सायलियम हस्क असेही म्हणतात. पचनसंस्था सुधारण्यासाठी इसबगोलचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. ज्या व्यक्तींना आपले वजन कमी करायचे आहे अथवा ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी या सफेद पदार्थाचा इसबगोलचा वापर केल्यास उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र याचा वापर डॉक्टरांना विचारल्याशिवाय करणे योग्य नाही. डॉ. अनन्या राऊत यांनी याबाबत अधिक माहिती देत कसा फायदा होतो हेदेखील सांगितले आहे (फोटो सौजन्य - iStock)
पचनसंस्था सुधारण्यासाठी इसबगोलचे सेवन करणे योग्य आहे. हे पचनसंस्था सुधारते आणि गॅस, पोटफुगीसारख्या समस्यांपासून आराम देते
रात्री पाण्यात इसबगोल मिसळून प्यायल्याने सकाळी पोट साफ होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी ते पिणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते
इसबगोल मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते. तथापि, जर तुम्ही औषध घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर इसबगोल घ्या
इसबगोल तुमचे केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासदेखील मदत करू शकते. याचे सेवन केल्याने केसांची वाढ सुधारते आणि त्वचा स्वच्छ होते
इसबगोलमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी ते सेवन करणे फायदेशीर आहे
इसबगोलचे सेवन करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तसंच याचे अतिसेवन करणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते