सर्वांना प्रवास करायला आवडते. असे देखील अनेकजण असतात ज्यांना मित्र किंवा कुटूंबासोबत प्रवास करण्यापेक्षा एकट्याला प्रवास करणं जास्त आवडतं. एकट्याने प्रवास करणे ही एक पाश्चात्य संकल्पना आहे, जी आता भारतातही लोकप्रिय होत आहे. यामध्ये, कोणतीही व्यक्ती आपली बॅग पॅक करते आणि एकटीच दुर्गम ठिकाणी भेट देण्यासाठी निघते. अशा प्रकारचा प्रवास मानसिक शांती देतो. जेव्हा महिलांचा विचार केला जातो, तेव्हा त्यांच्या सोलो ट्रीपसाठी एक उत्तम ठिकाणं शोधणं एक मोठं आव्हान बनतं. कारण सध्या घडत असलेल्या गुन्ह्यांमुळे महिलांनी एकट्याने प्रवास करताना काळजी घेणं फार गरजेचं आहे. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे महिला एकट्याने सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
बॅग भरो और निकल पडो... महिलांनो एकट्याने प्रवास करायचाय? मग सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहेत 'हे' देश

आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे कोणतीही महिला एकटीने प्रवास करण्याचा विचार करू शकते.

उदयपूर - जर तुम्हाला एकट्याने प्रवास करायचा असेल तर उदयपूर तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर राजेशाही इतिहास, निसर्ग आणि आधुनिकतेचा संगम आहे.

शिलाँग - शिलाँग ही ईशान्य भारतात स्थित मेघालयाची राजधानी आहे. शिलाँग त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हिरवेगार पर्वत, शांत तलाव आणि कोसळणारे धबधबे मनाला ताजेतवाने करतात.

ऋषिकेश - साहस शोधणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी ऋषिकेश हा एक उत्तम पर्याय आहे. गंगेच्या काठावर योग आणि ध्यानाचा आनंद घेत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी ऋषिकेश शेकडो वर्षांपासून एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

पाँडिचेरी - पाँडिचेरी हे त्याच्या फ्रेंच वसाहती वास्तुकला, प्राचीन समुद्रकिनारे आणि कॅफे संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण मानले जाते.

मथुरा-वृंदावन - भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे शहर मथुरा-वृंदावन हे दिल्लीजवळील पौराणिक महत्त्व असलेले शहर आहे. दरवर्षी, भारत आणि परदेशातून कोट्यवधी भाविक तिथे पोहोचतात. हे शहर महिलांसाठी सुरक्षित आहे.






