आशिया कप ट्रॉफी(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ ला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ जोरदार तयारीला लागले आहेत. यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. आशिया कप २०२५स्पर्धेचे आयोजन उई. यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाणार आहे. युएईमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आशिया कपमधे अनेक विक्रम रचले गेले आहेत. यातील काही विक्रम हे लाजिरवाणे आहेत. ज्या विक्रमात आपले नाव येऊ नये असे सर्वच खेळांडूना वाटत असते. तो म्हणजे टी-२० स्वरूपातील आशिया कपमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंचा विक्रम. चला आपण जाणून घेऊया या नकोशा यादीत कोण कोण शामिल आहे.
आशिया कपमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या लाजिरवाण्या हा खेळाडूंमध्ये बांगलादेशचा मशरफे मोर्तझाचे नाव घ्यावे लागते. तो तीन वेळा शून्यावर आपली विकेट देऊन बसला आहे. यामध्ये मनोरंजक गोष्ट म्हणजे मोर्तझा एकाच हंगामात तीन वेळा खाते न उघडताच माघारी परतला आहे.
हेही वाचा : ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर BCCI चे उघडले डोळे! ‘सीरियस इंजरी रिप्लेसमेंट’ या नव्या नियमाची केली घोषणा
मशरफे मुर्तझाने आशिया कप २०१६ मध्ये पाच सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२.८० च्या सरासरीने एकूण पाच बळी टिपले आहेत. गोलंदाजीत या खेळाडूची कामगिरी समाधानकारक राहिली असली तरी, फलंदाजीत हा क्रिकेटपटू मात्र काही एक करू शकला नाही. मशरफे मुर्तझाने पाचही डावात फलंदाजी केली असून त्याने ३.५० च्या सरासरीने फक्त १४ धावा काढल्या होत्या. या त्याने केवळ फक्त दोन चौकार लगावले होते. टी-२० स्वरूपातील आशिया कपमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या यादीत चारिथ अस्लंका, आसिफ अली, किंचिंत शाह, कुसल मेंडिस, हार्दिक पंड्या आणि दासुन शनाका संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. हे खेळाडू दोन वेळा खाते न उघडता आपली विकेट देऊन बसले आहेत.
भारतीय संघ १० सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ च्या मोहिमेला सुरवात करेल. टीम इंडिया आपला पहिला सामना यूएई विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधील तिसरा सामना १९ सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध खेळेल. भारताव्यतिरिक्त, ग्रुप अ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि यूएईचे संघ आहेत, तर ग्रुप ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँग-चीन आणि अफगाणिस्तान यांचा सहभाग आहे.