(फोटो सौजन्य: istock
आजच्या वेगवान जीवनशैलीत हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) ही एक सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. वाढलेला रक्तदाब हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम करतो. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच याला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. औषधोपचाराबरोबरच आपण आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणेही तेवढेच आवश्यक आहे. याच संदर्भात जपानमध्ये विकसित झालेली एक खास पद्धत फार चर्चेत आहे. तुम्ही जर या पद्धतीचा आपल्या जीवनशैलीत समावेश केला तर तुमचे ब्लड प्रेशर कधीही वाढणार नाही आणि याच्या नियमित जीवनात या ट्रिकचा समावेश केल्याने तुमचे दैनंदिन आरोग्यही निरोगी होण्यास मदत होईल.
काय आहे ही जपानी ट्रिक?
जपानी संशोधकांनी इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग (Interval Walking Training) नावाची तंत्र विकसित केली आहे. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. हा एक व्यायामाचा प्रकार आहे ज्यात हळू किंवा जलद चालले जाते.
इंटरव्हल वॉकिंग म्हणजे काय?
सन 2007 मध्ये प्रा. हिरोशी नोसे आणि शिजुए मासुकी यांनी ही पद्धत विकसित केली. या तंत्रात चालण्याला दोन टप्प्यांत विभागले जाते:
हा क्रम सलग पाच वेळा पुन्हा केल्यास सुमारे ३० मिनिटांची वॉकिंग होते, ज्यात १५ मिनिटे वेगवान आणि १५ मिनिटे मंद गतीत चालणे असते.
जपानी ट्रिकने रक्तदाब कसा नियंत्रित करायचा?
संशोधनानुसार, या प्रकारे चालल्यास रक्तवाहिन्यांची क्रियाशीलता वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो. नियमित इंटरव्हल वॉकिंगमुळे सिस्टोलिक बीपी सुमारे ९ mmHg तर डायस्टोलिक बीपी सुमारे ५ mmHg ने कमी होऊ शकतो. तसेच शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते, जी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरते.
इतर फायदे
सुरुवात कशी करावी?
Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल
इंटरवल वॉकिंगसाठी काही टिप्स काय आहेत?
टायमर वापरा, तुमच्या शरीराचे ऐका, सातत्यपूर्ण रहा, हळूहळू याची सुरुवात करा.
कोणीही इंटरवल वॉकिंग करू शकतो का?
होय, इंटरवल वॉकिंग ही पद्धत सर्व वयोगटाच्या लोकांसाठी फायद्याची आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.