पाकव्याप्त पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे चुंबन घेऊन पळाला युवक (फोटो-ट्विटर/@mktyaggi)
Social Media Viral Video: सोशल मीडियावर आपण दररोज काही वेळ का होईना स्क्रोल करत असतो. त्या ठिकाणी आपल्याला अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. जो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाकव्याप्त पंजाबच्या मुख्यमंत्री आणि पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांचे एक युवक चुंबन घेताना दिसून येत आहे.
पाकव्याप्त पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांना एक युवक किस करताना दिसून येत आहे. मरियम नवाज यांच्या पोस्टरला एक युवक किस करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाला व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये महिला बुरख्यात देखील सुरक्षित नाहीत असे, एका युजरने व्हिडिओवर उपहासात्मक कमेंट केली आहे.मग हा बुरखा घालून काय उपयोग? हा व्हिडीओ एक प्रकारे पाकिस्तानी लोकांचा महिलांबद्दलचा विचार प्रतिबिंबित करतो. या व्हिडीओने पाकिस्तामध्ये एकच खळबळ उडवली आहे.
क्या फायदा बुर्के का, जब पोस्टर पर भी सलमा सुरक्षित नहीं है.. pic.twitter.com/eaXMzR2gJu
— 𝙼𝚛 𝚃𝚢𝚊𝚐𝚒 (@mktyaggi) August 16, 2025
चुंबन घेऊन पळाला युवक
व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचा असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये त्या प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचे एक पोस्टर लागलेले आहे. त्या पोस्टरजवळ एक युवक येऊन त्यांचे चुंबन घेत आहे असे या व्हिडिओत दिसून येत आहे. व्हिडिओत पोस्टरच्या आजूबाजूला काही लोक असल्याचे देखील दिसून येत आहे.