Sci-Fi चित्रपट म्हणजेच Science Fiction सिनेमा! विज्ञानाच्या काल्पनिक दुनियेत घेऊन जाणारे हे चित्रपट पाहण्यास एक वेगळीच मज्जा असते. एका अनोख्या जगाची सफर या चित्रपटांमध्ये घडून येते. आजकालचे तरुण या चित्रपटांकडे फार आकर्षित आहेत. जर तुम्ही अशा चित्रपटांचा शोध घेत आहात तर Netflix वर उपल्बध असणाऱ्या या काही Sci Fi चित्रपटांचा नक्कीच आस्वाद घ्या.
Netflix वर उपल्बध 'हे' Sci-Fi सिनेमे नक्की पहा. (फोटो सौजन्य - Pinterest)
'Inception' हा सिनेमा 2010 रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात एक चोर जो ‘ड्रीम शेअरिंग टेक्नॉलॉजी’च्या मदतीने कॉर्पोरेट गुपितं चोरतो, त्याला एका CEO च्या मनात कल्पना रुजवण्याचं उलटं काम दिलं जातं. मात्र त्याचा दु:खद भूतकाळ हा संपूर्ण प्रकल्प आणि त्याच्या टीमला अपयशाकडे नेऊ शकतो. हा चित्रपट पाहण्याजोगा आहे.
'Interstellar' हा सिनेमा २०१४ रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये दाखवण्यात आलं आहे की, जेव्हा भविष्यात पृथ्वीवर राहणं अशक्य होतं, तेव्हा एक शेतकरी आणि माजी नासा पायलट जोसेफ कूपर याला शास्त्रज्ञांच्या टीमसह एक नवीन ग्रह शोधण्यासाठी अंतराळयान चालवण्याची जबाबदारी दिली जाते.
८०च्या दशकातील 'Star Wars: Episode V - The Empire Strikes Back' या चित्रपटात, जेव्हा साम्राज्य बंडखोर आघाडीवर मात करतं, तेव्हा ल्यूक स्कायवॉकर जेडाय मास्टर योडा यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात करतो, तर डार्थ वेडर आणि इनामदार शिकारी बोबा फेट त्याच्या मित्रांचा आकाशगंगेत पाठलाग करत असतात.
'The Matrix' १९९९ साली प्रदर्शित झाला असून Netflix वर उपलब्ध आहे. या चित्रपटात दाखवले आहे की, जेव्हा एक सुंदर अनोळखी व्यक्ती संगणक हॅकर निओला एका रहस्यमय अंडरवर्ल्डकडे घेऊन जाते, तेव्हा तो एक धक्कादायक सत्य जाणतो – त्याचं जे आयुष्य आहे ते एका वाईट सायबर बुद्धिमत्तेचं कौशल्यपूर्ण बनावट रूप आहे.
१९७७ साली प्रदर्शित झालेला 'Star Wars: Episode IV - A New Hope' हा चित्रपट फार प्रसिद्ध आहे. यामध्ये ल्यूक स्कायवॉकर एका जेडाय नाईट, एक उर्मट पायलट, एक वुकी आणि दोन ड्रॉइड्स यांच्या मदतीने आकाशगंगा साम्राज्याच्या विध्वंसक शस्त्रास्त्रापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर रहस्यमय डार्थ वेडरच्या तावडीतून प्रिन्सेस लेयाला वाचवण्याचाही प्रयत्न करतो.