'भुल भुलैया 3'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत सर्वांचेच वेधले आहे.
Bhul Bhulaiyaa 3 Success Party
'भुल भुलैया 3'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनने मुख्य भूमिका साकारली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत सर्वांचेच वेधले आहे.
बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. कार्तिक आर्यनच्या सिनेकरियरमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये 'भुल भुलैया 3' चित्रपटाचा समावेश झाला आहे.
'भुल भुलैया 3'ला मिळालेलं अभूतपुर्व यश सेलिब्रेट करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने मुंबईमध्ये जंगी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. चित्रपटाने रिलीजच्या दहा दिवसांत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.
भूषण कुमार यांनी सुरू केलेला आणि अनीस बज्मी दिग्दर्शित प्रोजेक्ट फ्रँचायझीमधील या तिसऱ्या भागाने सगळ्यांची मन जिंकली. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिस रेकॉर्डच मोडीत काढले नाहीत तर विनोद, थरार आणि नॉस्टॅल्जियाच्या परिपूर्ण मिश्रणाने प्रेक्षकांनाही मोहित केले आहे.
हे मेगा-सेलिब्रेशन एक अविस्मरणीय रात्र ठरली यात शंका नाही ! कलाकार आणि क्रू यांनी कार्यक्रमात खास हजेरी लावली असून भूल भुलैया 3 ह या वर्षातील सर्वात मोठ्या बॉलीवूड हिट गाण्यांपैकी एक म्हणून आपले स्थान पक्के करत प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.