आता बिग बॉस 18 च्या फिनालेसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे आणि प्रेक्षक शोच्या विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या सीझनचा विजेता कोण असेल यावर सर्वांचा अंदाज लावला जात आहे. शोच्या शेवटच्या आठवड्यात एकूण सात स्पर्धक शिल्लक आहेत, त्यापैकी एक आठवड्याच्या मध्यात बाहेर काढला जाईल. बिग बॉस १८ च्या टॉप ५ लोकप्रिय स्पर्धकांची अंतिम यादी ओरमॅक्स मीडियाने X खात्यावर जारी केली आहे. यावेळी या यादीत मोठी उलथापालथ झाली असून टॉप ५ च्या यादीमध्ये नव्या स्पर्धकाने एंट्री केली आहे. फोटो सौजन्य - Jio Cinema
टॉप ५ च्या शर्यतीत टिकून राहिलेले स्पर्धक. फोटो सौजन्य - Jio Cinema

विजेता होण्याच्या शर्यतीमध्ये करणवीर मेहरा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे पण तो शो जिंकेल सर्वाधिक चान्स आहेत असे म्हंटले जात आहे. त्यामुळे आता या शोचा विजेता कोण होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. फोटो सौजन्य - Jio Cinema

या यादीमध्ये एकमेव महिला सदस्य आहे ती म्हणजेच शिल्पा शिरोडकर. शिल्पा ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे तिच्या नात्यांवर घरामध्ये त्याचबरोबर प्रेक्षकांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. फोटो सौजन्य - Jio Cinema

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विवियन डिसेना आहे. परंतु विवियनने शोमध्ये फार काही करू शकला नाही त्याचे घरामध्ये सर्वात कमी योगदान होते पण त्याची घराबाहेर त्याने केलेल्या कामामुळे लोकप्रियता आहे त्यामुळे त्याला विजेत्यांच्या यादीमध्ये गणले जात आहे. फोटो सौजन्य - Jio Cinema

ओरमॅक्स मीडियाच्या या यादीनुसार अविनाश मिश्रा पाचव्या क्रमांकावर आहे, म्हणजेच अविनाशने सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांच्या यादीत प्रवेश केला आहे. याआधी चाहत पांडे अविनाश मिश्राच्या जागेवर होता. फोटो सौजन्य - Jio Cinema

ओरमॅक्स मीडियाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर रजत दलाल आहे. त्याला बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विस यादवचा बाहेरून सपोर्ट असल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फोटो सौजन्य - Jio Cinema






