श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आठ महिन्यांनी तिने लग्नाचं रिसेप्शन दिलं होतं. आता दोघेही पुन्हा दिडवर्षांनंतर लग्नबंधनात अडकणार आहेत.
Sreejita De-Michael Blohm-Pape Haldi Photos
टिव्ही अभिनेत्री श्रीजीता डे आणि तिचा पती मायकल ब्लोहोम पेप सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी कॅथलिक पद्धतीने लग्न केलं होतं. आता बंगाली पद्धतीने लग्न करणार आहेत.
१० नोव्हेंबरपासून श्रीजीता आणि मायकलच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली आहे. गोव्यात हे जोडपं लग्नगाठ बांधणार असून मेहेंदी, हळदी आणि संगीत यांसारख्या कार्यक्रमांसह लग्न करत आहेत.
काल मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला असून आज हळदीचा कार्यक्रम आहे. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. श्रीजिता आणि मायकेलने लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये एकमेकांसोबत खास क्षण घालवले.
"दिल से दिल तक... प्रेम आणि आनंदाचा पिवळा रंग #Haldi" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले. दोघांनी हळदीसाठी पांढरे कपडे घातले होते. दोघांच्याही रोमँटिक अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधलेय.
फोटोंमध्ये दोघेही त्यांच्या लग्नाआधीचे विधी एन्जॉय करताना दिसत आहेत. श्रीजिताच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.