महाभारतातील सगळ्यात कुशल असा धुरंधर अर्जुन! जरी पाच पांडवांपैकी एक असला तरी तो पांडुपुत्र नव्हे. अर्जुन जन्माची कथा फार रोचक आहे. त्याचे गुण इंद्राशी जुळवले जातात. तो इंद्र पुत्र का झाला? त्याची ख्याती अशी का आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात.
पाच पांडवांच्या जन्माबद्दल रोचक कथा! (फोटो सौजन्य - Social Media)
मुळात, पांडवांची आई कुंती तारुण्यात एका साधूला जाऊन भेटते. त्याच्याकडून पुत्रप्राप्तीचा मंत्र धारण करते. पण हा मंत्र काम करतो की नाही हे पाहण्यासाठी सूर्याला प्रसन्न करत, सूर्यपुत्र कर्णाला जन्म देते.
कर्णाला नदीच्या पात्रता सोडले जाते. पण विवाह झाल्यानंतर कुंती आणि पांडू, पुत्रप्राप्ती करण्यात असमर्थ असतात.
तेव्हा देवांची आराधना करत कुंती त्या मंत्राचा वापर करते. धर्मराजाला प्रसन्न करत युधिष्ठीर जन्मतो. वरुणाला प्रसन्न करत भीम जन्मतो.
इंद्र देवाची आराधना करून कुंतीला जी पुत्रप्राप्ती होते त्या धुरंधर अर्जुना इंद्राचे कौशल्य असते. त्याचे तेज जणू इंद्राची सावली!
सहदेव आणि नकुल, कुंतीची सावत्र मुलं असतात.