फोटो सौजन्य: @Storyboard18_/ X.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार आणि बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Hyundai Motors. या साऊथ कोरियन कंपनीने आतापर्यंत अनेक चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच या कंपनीची धुरा आता एक भारतीय सांभाळणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर कंपनीतील CEO आणि MD पदाची जबाबदारी एका भारतीय व्यक्तीला देण्यात आली आहे.
नवीन Hyundai Venue दिसली रे! नव्या डिझाइनसह मिळेल लेव्हल 2 ADAS फिचर, ‘या’ महिन्यात होणार लाँच
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने Tarun Garg यांना त्याचे पुढील व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले आहे. ही नियुक्ती 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. तरुण गर्ग हे 29 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या HMIL मध्ये नेतृत्वाची भूमिका बजावणारे पहिले भारतीय असल्याने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या, तरुण गर्ग HMIL चे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) म्हणून काम करतात. या बदलानंतर, सध्याचे व्यवस्थापकीय संचालक, उन्सू किम, दक्षिण कोरियास्थित Hyundai मोटर कंपनी (HMC) मध्ये पुन्हा एकदा धोरणात्मक भूमिकेत दिसतील.
Tata Motors ने केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म
HMC चे अध्यक्ष आणि CEO जोस मुनोझ यांनी सांगितले की, “Hyundai Motor India Ltd. (HMIL) चं नेतृत्व करणारे पहिले भारतीय नागरिक म्हणून तरुणची नियुक्ती ही आमच्या जवळपास तीन दशकांच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि निर्णायक घटना आहे. हे एक बदल घडवणारे दूरदृष्टीचे लीडर आहेत, ज्यांना भारतीय बाजाराची सखोल जाण असून ते प्रगत विचारसरणी घेऊन येतात. COO म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली HMIL ने सलग तीन वर्षे विक्रमी विक्री आणि नफा कमावला तसेच 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठं IPO यशस्वीपणे पूर्ण केलं. ते असे नेते आहेत जे लोकांना सर्वांत महत्त्वाचं मानतात, ग्राहकांना आदराने वागवतात, आपल्या टीमला सक्षम बनवतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास ठेवतात. मी उन्सू किम यांचेही आभार मानतो. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणामुळेच आज HMIL या उंचीवर पोहोचली आहे. त्यांच्या पुढील जबाबदाऱ्यांसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.