अंटार्क्टिका खंडात ग्लॅशियर वितळत आहेत. या वितळत्या ग्लॅशिअरमधून रक्तासारखे लाल रंग असलेले पाणी अगदी धबधब्यसारखे वाहत आहे. निसर्गाच्या या अद्भुत घटनेला साक्षी राहणे जरा कठीण आहे. कारण येथे सामान्य लोकांना जाणेही कठीण आहे आणि जाण्यासही बंदी आहे. फक्त वैज्ञानिक लोकं त्यांच्या संशोधनासाठी या ठिकाणी भेट देत असतात.
बर्फ़ाच्या डोंगरातून वाहतो रक्ताचा झरा! (फोटो सौजन्य - Social Media)
वैज्ञानिक म्हणतात की या पाण्याचा रंग लाल असण्याचे एकमात्र कारण म्हणजे या पाण्यात असणारा लोह! लोहाला गंज पकडल्याने पाण्याचा रंग लाल होतो.
मुळात, हे पाणी खारे आहे. त्यामुळे लोहाला गंज पकडण्याची प्रक्रिया आणखीनच सोपी होऊन जाते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे पाणी ५० लाख वर्षांपासून या बर्फाखाली दाबून गेले आहे.
या पाण्यात सहसा ऑक्सिजन अगदी नाहीच्या प्रमाणात आहेत, तरीही येथे सुष्मजीव आढळून येतात. जे मंगळासारख्या ग्रहावरही जीवसृष्टी असण्याचे संकेत देतात.
या ठिकाणी अनेक संशोधने केली जात आहेत. या वास्तूवर अनेक अभ्यास केली जात आहेत. याचा भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे.
येथे वाहणाऱ्या लाल रंगाच्या धबधब्यांमुळे या जागेला 'रेड फॉल्स' असे नाव देण्यात आले आहे, जे दिसण्यास खूप भयावह दिसते.