कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांसाठी 'मसीहा' ठरलेला अभिनेता सोनू सूद त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्याचा 'फतेह' चित्रपट चर्चेत आला आहे. अभिनेता सोनू सूद त्याच्या मित्रांसह उज्जैनला पोहोचला. नंदी हॉलमधून त्यांनी महाकालाचे ध्यानही केले.
Sonu Sood Visited Baba Mahakal And Blessings For Success Of Film Fateh
कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांसाठी 'मसीहा' ठरलेला अभिनेता सोनू सूद त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेत्याचा 'फतेह' चित्रपट चर्चेत आला आहे.
अभिनेता सोनू सूद त्याच्या मित्रांसह उज्जैनला पोहोचला. नंदी हॉलमधून त्यांनी महाकालाचे ध्यानही केले. मंदिराचे पुजारी प्रशांत आणि प्रदीप शर्मा यांनी महाकालेश्वरच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारातून अभिनेत्याच्या हस्ते बाबा महाकालेश्वरची पूजा करून घेतली. बाबा महाकालेश्वरचा अभिषेक करण्यात आला.
सोनू सूद आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या यशासाठी महाकालच्या मंदिरात पोहोचला होता. " 'फतेह'च्या शुटिंगवेळीच मी बाबा महाकाल यांचा आशीर्वाद घेतलाय. आज तो चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. म्हणूनच मी देवाचे आभार मानायला आलो आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्याने माध्यमांना दिली.
आमच्या चित्रपटाचे प्रमोशन येथूनच सुरू होईल, असेही यावेळी सोनूने सांगितले. अभिनेता सोनू सूदने बाबा महाकालचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. चित्रपटाच्या सक्सेससाठी अभिनेत्याने दर्शनही घेतले. सोनूचा आगामी चित्रपट १० जानेवारीला येतोय.
सोनू सूद पुढे म्हणाला की, हा सर्वसामान्यांसाठीचा चित्रपट आहे. हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित आहे. हा एक देशी चित्रपट आहे. महाकाल बाबांच्या कृपेने चित्रपटाचे चित्रीकरण खूप चांगले झाले आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल याची अपेक्षा आहे.