‘बिग बॉस १६’ मुळे प्रकाश झोतात राहिलेली अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. काही तासांपूर्वीच अंकिताने इन्स्टाग्रामवर रेड कलरची पैठणी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
Ankita Lokhande Photos
‘बिग बॉस १६’ मुळे प्रकाश झोतात राहिलेली अंकिता लोखंडे सध्या तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. काही तासांपूर्वीच अंकिताने इन्स्टाग्रामवर रेड कलरची पैठणी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
तिने आपल्या हटक्या फॅशनच्या जोरावर चाहत्यांचे लक्ष वेधले. रेड पैठणी आणि त्यावर लाईट ब्लू शाल वेअर करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत. तिच्या लूकचे चाहते तुफान कौतुक करीत आहेत.
मराठमोळ्या लुकवर अभिनेत्रीने मराठमोळे दागिने वेअर करून एकापेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या फोटो पोजेसची जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे काही नातेवाईक सुद्धा दिसत आहेत. सर्वांनीच खूप सुंदर फॅशन करत हटके फोटोशूट केले आहे.
अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.