शरीर आतून बळकट करण्यासाठी ब्रोकोली खाण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. हिरवीगार, फ्लॉवर प्रमाणे दिसणाऱ्या ब्रोकोलीचे अनेक लोक सेवन करतात. वजन कमी करताना ब्रोकोली सँडविच किंवा सूप बनवून प्यायले जाते. यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात तुम्ही ब्रोकोलीचे सेवन करू शकता. पण आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी ब्रोकोली काहींच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी आहारात ब्रोकोली खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी Broccoli ठरेल हानिकारक
थायरॉईडच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी आहारात ब्रोकोलीचे सेवन करू नये. कारण यामध्ये 'गॉइट्रोजन' नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे हायपोथायरॉईडीझमचा त्रास वाढू शकतो.
ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. पण पचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात ब्रोकोली खाऊ नये. तसेच यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स पोटात गॅस निर्माण करू शकतात.
ब्रोकोलीमध्ये विटामिन के भरपूर प्रमाणात आढळते. विटामिन के शरीरातील रक्त गोठण्यास मदत करते. त्यामुळे रक्त पातळ करण्याची औषध चालू असल्यास ब्रोकोलीचे सेवन करू नये.
किडनी स्टोनची लक्षणे शरीरात जाणवू लागल्यास ब्रोकोली खाणे बंद करावे. ब्रोकोलीमध्ये ऑक्सलेट आणि कॅल्शियम शरीरात एकत्र मिक्स झाल्यानंतर किडनीमध्ये खड्डे तयार होतात.
गर्भधारणेदरम्यान ब्रोकोलीचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते. यामुळे पोटात गॅस वाढणे किंवा इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.