भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे, तर दुसरीकडे टेनिसचे सामने विम्बल्डनला सुरु आहेत. नोवाक जोकोविच या दिग्गज खेळाडुचे सामने देखील पाहण्यासाठी अनेक मोठे खेळाडु हे स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. विराट कोहली देखील दोन दिवसांपुर्वी देखील विम्बल्डनला सामना पाहण्यासाठी पोहोचला होता. आता त्याच्यानंतर भारतीय क्रिकेटचे अनेक खेळाडू हे विम्बल्डनला सामने पाहण्यासाठी पोहोचले आहेत त्याचे खास फोटो पाहा.
हे भारतीय क्रिकेट खेळाडू पोहोचले विम्बल्डनला. फोटो सौजन्य – X
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुसऱ्या सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. आता तो त्याच्या पत्नीसोबत विम्बल्डनला पाहायला मिळाला. आज तिसरा सामना खेळवला जाणार आहे, या सामन्यात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होणार आहे. फोटो सौजन्य – X
सुर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी हे दोघेही त्याच्या नव्या लुकमध्ये पाहायला मिळाले. सुर्याने विम्बल्डनला तो डॅशिग लुकमध्ये पाहायला मिळाला. त्याने पांढऱ्या रंगाचा कोट आणि काळ्या रंगाचा चश्मा घातला होता. फोटो सौजन्य – X
भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत हा देखील विम्बल्डनला सामना पाहण्यासाठी आला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. फोटो सौजन्य – X
सुर्यकुमार यादव याच्या आधी दीपर चाहर हा देखील विम्बल्डनला त्याच्या पत्नीसोबत पोहोचला होता. तो देखील त्याच्या डॅशिग लुकमध्ये दिसला. चाहरने काळ्या रंगाचा कोट घातला होता. फोटो सौजन्य – X
भारतीय T20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव याची नुकतीच सर्जरी झाली आहे, त्यानंतर तो आता विम्बल्डनला त्याच्या पत्नीसोबत दिसला. या दोघांचे काही फोटे सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. फोटो सौजन्य – X