चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते. या चाणक्यनीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी लिहिले आहे की, महिला कोणतेही महत्त्वाचे काम करताना फार विचार करतात आणि नंतर असे पाऊल उचलतात ज्याचा त्यांना पुढे पश्चाताप करावा लागतो.
चाणक्यनीती! महिलांच्या या सवयींमुळे पतीच्या आयुष्यात क्लेश निर्माण होतात
आचार्य चाणक्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये महिलांच्या सवयींविषयी काही भाष्य केले आहे. या सवयींमुळे घरात क्लेश, कलह निर्माण होतो आणि यातील काही सवयींमुळे नवऱ्याचे आयुष्याच क्लेशाने भरुन जाते
काही सवयी या जीवनात नकारात्मक परिणाम करत असतात. जर, महिलांनी पतीच्या दु:खात साथ दिली नाही, तर त्यांच्या जीवनात क्लेश निर्माण होतो.
काही महिलांना चुगली-चहाडी करण्याची फार सवय असते. ही नकारात्मक परिणाम घडवून आणते.
अशा व्यक्तीच्या संगतीमुळे तुमच्या आयुष्यातही नकारात्मकता येऊ शकते, त्यामुळे चुगली करणाऱ्या महिलांपासून शक्यतो हवे तितके लांब राहा
पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त छळ, कपट करतात. आपल्या याच सवयींमुळे त्यांना संकटांचा सामना करावा लागतो आणि याच सवयींमुळे त्या नवऱ्यापासूनही लांब होतात
आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा लोभ ठेवणे, फार चुकीची सवय आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये पैसा, सोना, हीरा आणि वस्त्र या बद्दल जास्त लोभ असतो.
याच लोभामुळे त्यांच्या आयुष्यात तणाव निर्माण होतो. त्यापासून महिलांनी हवे तितके दूर पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये दिला आहे