गिरणगावातील सर्वात जुने असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजेच 'चिंचपोकळी चा चिंतामणी' या नावाने प्रसिद्ध असणार्या उत्सव मंडळाची स्थापना १९२० साली लोकमान्य टिळकांचा आदर्श ठेवून करण्यात आली. यावर्षी मंडळ १०५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ अवतरला श्रीकृष्ण अवतारात, पाहा पहिली झलक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला असून मुंबईतल्या अनेक मोठ्या मानाच्या गणरायांचे वाजत गाजत आगमन होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लाखो गणेश भक्तांना वेध लागले होते ते चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याचे.
मुंबईतील सर्वात जुन्या मंडळांपैकी एक म्हणून चिंतामणी गणेशोत्सव मंडळाला ओळखले जाते. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वे वर्ष आहे.
लाखो गणेशभक्तांच्या उपस्थितीत, ढोल ताश्याच्या गजरात आणि गणरायाच्या जयघोषाने हा सोहळा पार पडला.
तरूणाईचं खास आकर्षण असलेल्या 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'चे रुप आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लाखो गणेशभक्त उपस्थित होते.
चिंतामणीच्या मुर्तीची उंची १८ फूट असून यंदा चिंतामणी श्रीकृष्ण अवतारात विराजमान झाला आहे.
बाप्पाला चिंतामणी रंगाचे धोतर नेसवलेले असून, त्यावर निळ्या रंगाचा शेला, बाप्पाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, सोन्या-चांदीचे दागिनेही परिधान केलेले दिसत आहेत.
यंदाची 'चिंतामणी'ची प्रभावळ श्रीकृष्ण अवतार जगन्नाथ आणि सोबत सुभद्रा तसेच बलराम अशी संकल्पना साकारली आहे.