ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली या मालिकेचा तिसरा सामना काल झाला. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली पण या तीनही सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने कमालीचा खेळ दाखवला आहे. त्याने आता विराट कोहलीचा देखील रेकाॅर्ड मोडला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ब्रेविसने मोडला रेकाॅर्ड. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने तुफानी खेळी केली. मात्र, त्यानंतरही त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
देवाल्डने २२ चेंडूत अर्धशतक झळकावले. उजव्या हाताच्या या फलंदाजाने २६ चेंडूत एक चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. या खेळीसह देवाल्डने विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ब्रेव्हिस आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याने कोहलीचा १० डावात १२ षटकार मारण्याचा मागील विक्रम मागे टाकला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दक्षिण आफ्रिकेच्या या स्टारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या डावात ही कामगिरी केली आहे. ब्रेव्हिसने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४ षटकार मारले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना खूप रोमांचक झाला आणि ग्लेन मॅक्सवेलने शेवटच्या चेंडूवर सामना संपवला. त्याने ३६ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया