चेहऱ्यावरील तेज कमी झालं आहे? मग झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच फ्रेश आणि सुंदर हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे किंवा चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज आणि खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे त्वचेला सूट होतील असेच स्किन केअर प्रॉडक्ट वापरावे. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायमच टिकून राहते आणि चेहरा अतिशय उजळदार दिसतो. बऱ्याचदा शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरूम येणे किंवा लाल रॅश येण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी शरीर डिटॉक्स करणे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील तेज पुन्हा मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात तूप, लिंबचा रस, किंवा मध मिक्स करून पिऊ शकता. या पदार्थाच्या सेवनामुळे त्वचेसह आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतील. त्वचा आतून स्वच्छ होईल. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि पिंपल्स घालवण्यासाठी तूप अतिशय प्रभावी ठरते. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवते. याशिवाय लिंबामधील विटामिन सी युक्त गुणधर्म त्वचेचा खराब झालेला रंग सुधारण्यासाठी मदत करतात. त्वचेचा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे ऑक्सिजन आणि न्युट्रिएंट्स त्वचेमध्ये सहज मिक्स होतात. नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यास शरीर आणि त्वचा आतून स्वच्छ होते.
पोट स्वच्छ होत नसल्यास तुम्ही तूप किंवा लिंबाच्या पाण्याचे सेवन करू शकता. पिंपल्समुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन आणि डलनेस कमी करण्यासाठी झोपेची गुणवत्ता सुधारावी. निरोगी त्वचेसाठी ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे. याशिवाय रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात तूप, लिंबू किंवा मध इत्यादी पदार्थ मिक्स करून प्यायल्यास शरीरातील साचलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करून त्वचेला पोषण द्यावे.