हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे हाडांचे दुखणे, वाढलेले वजन, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जीवनशैलीत होणाऱ्या चुकीच्या बदलांकडे लक्ष दिसून निरोगी जीवनशैली जगणे आवश्यक आहे. बऱ्याचदा कमी वयात सुद्धा हाडांमधून सतत आवाज येऊ लागतो. शरीरात निर्माण झालेल्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमधून सतत आवाज येऊ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
हाडांमधून सतत आवाज येतो? रोजच्या आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचे सेवन
शरीराला भरपूर पोषण देणारा पदार्थ म्हणजे राजगिरा. रोजच्या आहारात राजगिऱ्याच्या लाडूचा किंवा राजगिऱ्यापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करावे.
खाण्याचा चुना आपल्यातील अनेकांना फारसा माहित नसेल पण या चुन्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळून येते.
कुळीथाच्या बारीक दाण्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. त्यामुळे हाडं दुखणे किंवा हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कुळीथ दाण्यांचे सेवन करावे.
पांढऱ्या तिळांपासून बनवलेल्या लाडूचे सेवन सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हाडांमधील कमी झालेले कॅल्शियम वाढते.
रोजच्या आहारात कॅल्शियम युक्त नाचणीचे नियमित सेवन करावे. नाचणी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आढळून येते.