निरोगी आरोग्य जगण्यासाठी शरीराला नेहमी पोषक घटकांची आणि जीवनसत्वांची आवश्यकता असते. शरीरातील कोणत्याही विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरात विटामिन ई ची कमतरता निर्माण
विटामिन ई युक्त पौष्टिक फळे
ब्रोकोलीमध्ये विटामिन सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात ब्रोकोलीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. हिवाळ्यात वरील पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.
रोजच्या आहारात पालेभाज्यांचे सेवन करावे. यामध्ये विशेषता पालक खावे. पालकमध्ये आढळून येणारे विटामिन सी आरोग्यसाठी अतिशय गुणकारी आहे. पालक खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
विटामिन सी युक्त पपईमध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. पपईपासून तुम्ही ज्युस बनवून पिऊ शकता. शिवाय पपईचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं किवी हे फळ खूप आवडते. चवीला आंबट गोड असलेल्या किवीमध्ये विटामिन ई आणि इतर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर किवी खावी.
एवोकॅडोमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ई आढळून येते, ज्यामुळे रोजच्या आहारात या फळाचे सेवन करावे. एवोकॅडोपासून तुम्ही सँडविच, स्मूदी, सॅलड इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता.