आयुर्वेदामध्ये अशवगंध वनस्पतीला वनस्पतीला विशेष महत्व आहे. मागील कित्येक वर्षांपासून अशवगंधचा वापर औषध किंवा इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. निरोगी आरोग्यासाठी अनेक लोक आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि औषधी वनस्पतीचे सेवन करतात. अशवगंधामध्ये एक नाहीतर अनेक गुणधर्म आढळून येतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या वनस्पतीचे सेवन केल्यामुळे झोपेची कमतरता दूर होते. आज आम्ही तुम्हाला अशवगंधाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
Stamina वाढण्यापासून ते झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशवगंधाचे करा नियमित सेवन
शरीरात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे. अशवगंधचे सेवनामुळे शरीरातील झोपेची गुणवत्ता सुधारून मन शांत राहते आणि आरोग्य सुधारते.
जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याऱ्या मुलांसाठी अवशगंधा अतिशय प्रभावी आहे. यामुळे शरीरातील स्नायूंची ताकद वाढते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.
अश्वगंधामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते,ज्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. यामुळे त्वचेमधील जळजळ सुद्धा कमी होते.
रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात अशवगंधाचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून मधुमेह होत नाही.
अशवगंधाच्या पावडर एक ग्लास ग्लास दुधात टाकून मिक्स करून नियमित प्यायल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतात.