उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात चिया सीड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. चिया सीड्स खाल्यामुळे उष्णता कमी होते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. या बियांमध्ये असलेले फायबर शरीरासाठी आवश्यक ठरते. फायबरमुळे शरीर स्वच्छ होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. चिया सीड्सचा वापर सरबत बनवताना, ओट्स किंवा मोजितो बनवताना चिया सीड्सचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिया सीड्स खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात शरीर राहील कायम थंड! रोजच्या आहारात करा चिया सीड्सचे सेवन
चिया सीड्सचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात केले जाते. कारण या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्स महत्वाचे ठरतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही चिया सीड्सचे पाणी पिऊ शकता.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३, फायबर आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळून येते. याशिवाय यामध्ये इतरही पोषक घटक आढळून येतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिया सीड्स अतिशय महत्वाचे आहेत. कारण या बियांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करावे.
त्वचेवर आलेले पिंपल्स, मोठे फोड आणि एक्ने कमी करण्यासाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि शरीर कायम थंड राहते.
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा चिया सीड्स टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी पाण्याचे सेवन करा. तसेच तुम्ही चिया सीड्सचा वापर करून फेसपॅक सुद्धा बनवू शकता.