धावपळीच्या जीवनात शरीर कायमच निरोगी ठेवणे एक आव्हान बनवले आहे. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला ताण, चुकीच्या वेळी जेवण, अपुरी झोप आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेवर गंभीर परिणाम दिसून येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि फोड आल्यानंतर ते घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते. पण तरीसुद्धा पिंपल्स कमी होत नाही. त्वचा चमकदार आणि अतिसुंदर ठेवण्यासाठी शरीर आतून स्वच्छ ठवणे आवश्यक आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे. जाणून घ्या चिया सीड्सच्या पाण्याचे त्वचा आणि आरोग्याला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी उपाशी पोटी करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन
चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बद्धकोष्ठता आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ ठेवण्यासाठी उपाशी पोटी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पेयांचे किंवा डिटॉक्स ड्रिंकचे सेवन केले जाते. अशावेळी चिया सीड्सच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होईल.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी चिया सीड्सचे पाणी प्यावे. यामुळे शरीरात थंडावा टिकून राहतो. यामुळे शरीर कायमच हायड्रेट राहते.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अल्फा-लिनोलेनिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे शरीरात वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हार्ट अटॅकचा धोका उद्भवत नाही.
शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करावे. चिया बिया कार्बोहायड्रेट्सचे पचन मंदावतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.