पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात. साथीच्या आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय शरीरात निर्माण झालेली विटामिन सी ची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. पावसाळ्यासह इतर दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार वाढू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात करा 'या' Vitamin-C युक्त पदार्थांचे सेवन
विटामिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित एक संत्र खावे. संत्र्याचा रस किंवा संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीर सुधारते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी संत्र्याचे सेवन करावे.
आवळा खाणे आरोग्य आणि केसांसाठी फायदेशीर आहे. नियमित एक आवळा किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यास मदत होईल.भारतीय घरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
लिंबू खाल्यामुळे जेवणाची चव वाढते आणि शरीरसुद्धा अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
शिमला मिरची खाणे अनेकांना आवडत नाही. पण चवीला तिखट लागणारी शिमला मिरची विटामिन सी वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही जेवणात रंगीत शिमला मिरचीचे सेवन करू शकता.
लहान मुलांपासून गाडी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडते. चवीला आंबटगोड लागणारा पेरू विटामिन सी चे प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे नियमित सॅलड किंवा नुसताच तुम्ही पेरू खाऊ शकता.