सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा पिण्याची सवय असते. काहींना काळा चहा लागतो तर काहींना दुधाची सवय असते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी दुधाचा चहा प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. दुधाचा चहा वारंवार प्यायल्यामुळे अपचन, गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या वाढू लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी प्यायल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर नियमित दुधाची पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित ग्रीन टी प्यावी. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय शरीरावर वाढलेले चरबीचे प्रमाण कमी होईल जाईल.
दुधाच्या चहामध्ये भरपूर साखर असते.त्यामुळे सकाळी उठल्यानंतर साखरयुक्त चहाचे सेवन करण्याऐवजी ग्रीन टी चे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ग्रीन उत्तम पर्याय आहे.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन करावे.
ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.याशिवाय ग्रीन टी प्यायल्यामुळे त्वचेची चमक वाढते.
शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमीकरण्यासाठी नियमित ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी चे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो, मन शांत होते याशिवाय शरीराला अनेक फायदे होतात.