अंजीर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी अंजीर खाल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला अनेक फायदे होतील. बऱ्याचदा अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता न करता असेच ऑफिसला निघून जातात. मात्र असे केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होऊ शकते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले एक किंवा दोन अंजीर खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भिजवलेले अंजीर खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर नियमित करा भिजवलेल्या अंजीरचे सेवन
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित भिजवलेले किंवा ओले अंजीर खावेत. कारण अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
वाढलेले वजन कमी करताना रोजच्या आहारात भिजवलेले अंजीर खावेत. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. तसेच अंजीर खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही.
अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी अनेक महत्वपूर्ण घटक आढळून येतात. ज्यामुळे हाडांचे कार्य सुधारते. हाडे मजबूत होतात आणि हाडांमधील घनता वाढते.
शरीराचा वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित अंजीर खावे. याशिवाय शरीरात साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी अंजीरचे सेवन केले जाते.
अंजीरमध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर खनिजे आढळून येतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित अंजीर खावे.