आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. शरीराची पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात विषारी घटक तसेच साचून राहतात. ज्यामुळे अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या वाढण्याची शक्यता असते. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे शरीरावर अनावश्यक चरबी तशीच साचून राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमी बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्या डिटॉक्स पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी करा 'या' डिटॉक्स पेयांचे सेवन
शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरातील सर्वच विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना डिटॉक्स पेय अतिशय प्रभावी ठरतात.
शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यासाठी रात्रभर पाण्यात अर्धा चमचा मेथी दाणे घालून भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे.
हळदीचे पाणी शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी मदत करते. कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून मिक्स करा नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि वाढलेले वजन कमी होईल.
धण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायिंगमध्ये गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.
महिलांच्या आरोग्यासाठी जिऱ्याचे पाणी अतिशय प्रभावी आहे. जिऱ्याच्या पाण्यात लिंबू मिक्स करून नियमित प्यायल्यास महिनाभरात शरीरात अनेक बदल दिसून येतील.